Rushikesh Jadhav

ऋषिकेश जाधव

प्रभाग क्रमांक १२ मॉडेल‌ कॉलनी हा पुणे शहरातील मध्यवर्ती व महत्त्वाचा भाग! या भागात सर्व स्तरातील नागरिकांचे वास्तव्य असल्याने सर्वांना हव्या असलेल्या सोयी-सुविधा मिळवून देणे हे येथील लोकप्रतिनिधीचे प्राधान्याने काम आहे. हेच ध्येय ठेवून आणि आदरणीय राहुलजी गांधी यांचा आदर्श समोर ठेवून आपले प्रतिनिधित्व करायला मी सज्ज आहे.

आजवर सामाजिक कामे, कोरोना काळातील कामे, गणपती मंडळे, नवरात्र मंडळांसाठी केलेली कामे, हनुमान टेकडी वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न या कामांतून मी आपल्या समोर आलो‌ आहे... अशीच कामे या पुढे व्हावीत व ती यशस्वी करून नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर करता यावे यासाठी मी प्रयत्नरत आहे.

प्रभाग क्रमांक १२ मॉडेल कॉलनी येथील नागरिकांनी माझ्या‌ कामाच्या स्वरूपात मला पाहिलेच आहे, मात्र तुमची सेवा करण्याची एक संधी तुम्ही मला द्यावीत ही नम्र विनंती!

मी आपल्या‌ सेवेत तत्पर असेन‌ ही खात्री नक्की देतो!